तीन जिल्हयातील पोलिसांना आव्हान देणारा दुचाकी चोर अखेर गजाआड,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 03:25 PM2017-09-11T15:25:55+5:302017-09-11T15:28:29+5:30
जालना, परभणी व औरंगाबाद या तीन जिल्ह्यात दुचाकी चोरून पोलिसांसमोर आव्हान उभे केलेल्या चोरास पकडण्यास अखेर यश आले. तिन्ही जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून लांबविलेल्या नऊ मोटारसायकलींसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी हि कारवाई केली.
जालना, दि. 11 : जालना, परभणी व औरंगाबाद या तीन जिल्ह्यात दुचाकी चोरून पोलिसांसमोर आव्हान उभे केलेल्या चोरास पकडण्यास अखेर यश आले. तिन्ही जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून लांबविलेल्या नऊ मोटारसायकलींसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी हि कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्ञानेश्वर नारायण सोळंके (२८, रा. गोंदी,ता.अंबड) हा सराईत दुचाकीचोर अंबड चौफुली परिसरात असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौर यांना रविवारी सकाळी लागला. त्यांनी तात्काळ पथकासह तेथे जात त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
अधिक चौकशी केली असता, आरोपीने परभणी जिल्ह्यातील पाथरी, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड व जालना येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, चैनसिंग गुसिंगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख रज्जाक, दिलीपसिंग ठाकूर, नारायण करनाडे, विश्वनाथ भिसे, पोहेकॉ. सुरेश गिते, भालचंद्र गिरी, प्रशांत देशमुख, समाधान तेलंग्रे, राहुल काकरवाल, सोमीनाथ उबाळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.