विनाअनुदानित शिक्षक करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:18+5:302021-01-23T04:31:18+5:30
जाफराबाद : विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतन अनुदानासह विविध मागण्यांसाठी २९ जानेवारी रोजी मुंबई येथे विविध संघटना एकत्र येत शिक्षक समन्वय ...
जाफराबाद : विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतन अनुदानासह विविध मागण्यांसाठी २९ जानेवारी रोजी मुंबई येथे विविध संघटना एकत्र येत शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जाफराबाद येथे सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. या कालावधीत अनेक सरकारे आली आणि गेली; परंतु हा प्रश्न अजूनही तसाच आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व शिक्षक बांधव आक्रमक झाले असून, सर्व शिक्षक मुंबई येथे बेमुदत उपोषण करणार आहेत. राज्यातील सर्व अनुदानास पात्र शाळांना १०० टक्के पगार द्यावा व ज्या शाळा अघोषित शाळा आहेत त्यांना घोषित करून त्यांनाही १०० टक्के पगार द्यावा. तसेच अंशत: अनुदानित शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस संजय अंभोरे, निवृत्ती दिवटे, गजानन बुरकुल, सदानंद लोखंडे, ज्ञानेश चव्हाण, कड, रामू शेवत्रे, सौदार शिरसाठ, रामेशवर सवडे, ज्ञानेश्वर सुरुशे, विजय अंभोरे, गणेश भोपळे, संतोष गाडेकर, भगवान कोल्हे, अनिल कठोले, जनार्दन वाघमारे, विजय मिसाळ यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. (फोटो)