पुतण्यानेच केला काकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:40 AM2019-02-02T00:40:30+5:302019-02-02T00:41:09+5:30
किरकोळ वादातून पुतण्यानेच काकाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथे शुक्रवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. युनूस शहा (५०, रा. बाभूळगाव) असे मयताचे नाव आहे.
भोकरदन : किरकोळ वादातून पुतण्यानेच काकाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथे शुक्रवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. युनूस शहा (५०, रा. बाभूळगाव) असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बाभूळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुतण्या माशुम दादांमिया शहा (२८) हा दारु पिऊन गोंधळ घालून शिवीगाळ करत होता. तेव्हा काका युनूस शहा यांनी त्याला घरी जाण्यास सांगितले. मात्र, तो घरी गेला नाही. त्यानंतर युनूस शहा यांनी माशुमला दोन चापटा मारुन घरी जाण्यास सांगितले. तेव्हाच माशुम शहाने जवळ असलेला चाकू काढून काकाच्या पोटात भोसकला. त्यानंतर युनूस शाह खाली कोसळले. तेथे असलेल्या नागरिकांनी धाव घेत त्यांना उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे रेफर केले.
परंतु, हसनाबाद फाट्याजवळ त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशारापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.