बदनापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना गेलडा यांचा एकमेव अर्ज, निवडीची औपचारिकता बाकी

By दिपक ढोले  | Published: June 30, 2023 07:04 PM2023-06-30T19:04:45+5:302023-06-30T19:05:09+5:30

नगराध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते.

Uncontested election of BJP's Archana Gelda as Badnapur Mayor | बदनापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना गेलडा यांचा एकमेव अर्ज, निवडीची औपचारिकता बाकी

बदनापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना गेलडा यांचा एकमेव अर्ज, निवडीची औपचारिकता बाकी

googlenewsNext

बदनापूर : येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आलेल्या दोन नामांकनपत्रांपैकी नगरसेविका नसीमबी शेख मतीन यांनी शुक्रवारी त्यांचा नामांकन अर्ज परत घेतला. त्यामुळे बदनापूरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना सत्यनारायण गेलडा यांची बिनविरोध निवड निश्चित झाले आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

बदनापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत भाजपकडून नगरसेविका अर्चना सत्यनारायण गेलडा यांचे दोन नामांकनपत्र व नगरसेविका नसीमबी शेख मतीन यांचे एक नामांकनपत्र, अशी एकूण दोन उमेदवारांचे तीन नामांकनपत्र दाखल झाले होते. नगरसेविका नसीमबी शेख मतीन यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी परत घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी दिली. नगराध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र, आज झालेल्या घडामोडीमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आ. नारायण कुचे यांच्या नियोजनामुळे पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Uncontested election of BJP's Archana Gelda as Badnapur Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.