बडी सडकवर अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:32 AM2019-01-07T00:32:16+5:302019-01-07T00:32:36+5:30

शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बडी सडकवरील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सकाळी ९ वाजेपासूनच तगडा बंदोबस्त लावल्यात आल्याने परिसरात अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होते.

Undeclared curb on large roads | बडी सडकवर अघोषित संचारबंदी

बडी सडकवर अघोषित संचारबंदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत बडी सडकवरील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी सकाळी ९ वाजेपासूनच तगडा बंदोबस्त लावल्यात आल्याने परिसरात अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण होते. ज्या भागात ही बैठक होणार होती, त्या परिसरातील चाहरही बाजूचे रस्ते बंद करून वाहतूक इतरत्र हलविण्यात आली होती. अशा स्थितीत अफवांचे पीक वेगात येत होते. नूतन वसाहत भागात दडगफेक झाली तर, काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. त्याचे पडसाद बैठकस्थळी उमटत होते.
विविध संघटनांनी भिडे यांच्या दौऱ्याला पायबंद करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य झाली नाही. सकाळी ठरल्या प्रमाणे भिडे व त्यांचे समर्थक हे जालन्यात दाखल झाले होते. त्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली बैठक दुपारी दीड वाजेपर्यंत चालली. बैठक झाल्या नंतरही भिडे यांनी अन्य शहरातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ज्याची ओळख आहे अशांना भिडेंच्या भेटीसाठी आत जाऊ दिले जात होते.
बैठकी बाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक हे साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास भाजपचे शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, नगरसेवक अशोक पांगारकर, चंपालाल भगत यांनीही घटनास्थळी भेट देऊन भिडेंची भेट घेतली. वीरेंद्र धोका यांच्या बडीसडकवरील निवास्थानी बैठकीनंतर भिडे यांनी अल्पोपाहार घेतला. त्यावेळी देखील भिडेंना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एकूणच भिडे यांच्या या दौºयामुळे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह बजरंग दलाचे कार्यकर्तेही बैठकस्थळी होते.
निदर्शने करणा-यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बैठकी दरम्यान शिवाजीपुतळा भागात निदर्शने करणा-यांना ताब्यात घेऊन पोलीसांनी त्यांना सदरबजार पोलीस ठाण्यात हलविले होते. हे कार्यकर्ते बैठक स्थळावरून जाताना त्यांनी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने तेथे काही काळ वातावरण तंग झाले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Undeclared curb on large roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.