अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेला अखर्चित निधी तातडीने खर्च करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:54 AM2019-12-14T00:54:06+5:302019-12-14T00:54:33+5:30
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत अनुसूचीत जाती-जमातींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत अनुसूचीत जाती-जमातींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी अखर्चित निधी तातडीने खर्च करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित बैठकीस आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे, सदस्य मधुकर गायकवाड, रमेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांची उपस्थिती होती.
अनुसूचित जाती-जमातींसाठी शासनातर्फे देण्यात येणा-या निधीची अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबाजवणी करावी. पशुसंवर्धन, पाणी पुरवठा अखर्चित निधी मुदतीत खर्च करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या. जिल्हा परिषदेतील आस्थापना विषयक बाबीवर आयोगाने समाधान व्यक्त केले. या बैठकीला विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.