जालन्यात विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:59 AM2018-08-20T00:59:15+5:302018-08-20T00:59:34+5:30
जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
या संदर्भात रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जालन्यातील आरटीओ कार्यालय परिसरात २५ एकर जागेवर हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन राज्यपाल विद्यासागर यांच्या हस्ते १७ सप्टेबरला होणार आहे. या केंद्रात विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, अद्यायावत इमारत तसेच अन्य सुविधांचा समावेश राहणार आहे. यासाठी अंदाजित खर्च हा शंभर कोटी रूपये येईल. हा खर्च केंद्र सरकार आणि विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्यावासायिक शिक्षण येथेच मिळणार आहे. पत्रकार परिषदेस भास्कर दानवे, किशोर अग्रवाल यांची उपस्थिती होती.