बेशिस्त पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:54+5:302021-01-25T04:31:54+5:30
हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जालना : शहरातील एम.जी. नाथाणी सिंधी हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांना यूपीएससी उत्तीर्ण सत्यकुमार उपाध्याय यांनी मार्गदर्शन ...
हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जालना : शहरातील एम.जी. नाथाणी सिंधी हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांना यूपीएससी उत्तीर्ण सत्यकुमार उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुखदेव बजाज, डॉ.राजकुमार सचदेव, प्रताप गेही, प्राचार्य प्रदीप देशमुख यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा अभ्यासक्रमाची माहिती दिली.
मोरेश्वर महाविद्यालयात वेबिनारला प्रतिसाद
भोकरदन : येथील मोरेश्वर महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन वेबिनार कार्यक्रमात सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनीष द्विवेदी, माधव जगताप, डॉ.भगवान डाेंगरे, डॉ.रघुनाथ सपकाळ, डॉ.हर्षल पाटील, डॉ.विठ्ठल गायकवाड, डॉ.गोवर्धन मुळक, डॉ.दिगंबर खरात, डॉ.गजानन खरात यांच्यासह प्राध्यापकांचा सहभाग होता. या वेबिनारमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अंबड : तालुक्यातील दहिपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.यू. मोरे, राम जाधव, रामभाऊ तोगे, मदन गायकवाड, राम मोरे, भागवत शेळके, शिक्षक जी.एम. शेख, ए.के. जायभाय, पी.आर.राठोड, एच.के. पटेल, एस.यू. उगले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.