शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:39 PM2022-03-09T17:39:06+5:302022-03-09T17:39:37+5:30

मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे.

Untimely rain slashing of wheat, caused severe damage to rabi crops | शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान

googlenewsNext

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागांत बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे. तर काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्याला गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, मुबलक पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, कांदा सिड्स, शाळू, मका आदी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या ही पिके सोंगणीस आली आहे. तर काही ठिकाणी सोंगणी सुरू आहे. माल घरी येण्याची तयारी सुरू असतानाच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात केली आहे. तर अनेकांचे पीक शेतात उभे आहेत. त्यातच बुधवारी पहाटे भोकरदन शहरासह तालुक्यातील आनवा, धावडा, आडगाव, जळगाव सपकाळ, वाकडी, पोखरी, गोकुळ, आव्हाना, वालसावंगी, केदारखेडा, बरंजळा, तडेगाव, भायडी, कुकडी, विरेगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले आहे.

फळबागांना मोठा फटका
बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील आंबे, द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा चांगल्या बहरात असतांना बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे.

Web Title: Untimely rain slashing of wheat, caused severe damage to rabi crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.