चुर्मापुरी उपकेंद्रांतर्गत १,१६० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:27+5:302021-06-23T04:20:27+5:30
महाकाळा : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या महाकाळा, भगवाननगर, हनुमाननगर, राजेशनगर, शारदाताईनगर, अजिंक्यनगर येथील ४५ वर्षांवरील ...
महाकाळा : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या महाकाळा, भगवाननगर, हनुमाननगर, राजेशनगर, शारदाताईनगर, अजिंक्यनगर येथील ४५ वर्षांवरील १,१६० नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती चुर्मापुरी उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. अतुल तांदळे यांनी दिली.
जवळपास ६० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले पूर्ण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. गावागावात लसीकरण मोहीम घेण्यात येत आहे. चुर्मापुरी उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्येही लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, १,१६० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी चुर्मापुरी उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. अतुल तांदळे, आरोग्य सहाय्यक विजय कांबळे, चुर्मापुरीचे सरपंच भैय्यासाहेब हातोट, उपसरपंच भैय्यासाहेब लोणे, महाकाळ्याचे सरपंच दत्तात्रय फुलझळके, उपसरपंच आबासाहेब लहाने, ग्रामसेवक एस. एम. कुलकर्णी, ग्रामसेवक सुरेश धोत्रे आदींनी परिश्रम घेतले.