सासखेड्यात १३८ जणांचे लसीकरण - पान तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:12+5:302021-09-12T04:34:12+5:30

लायन्सतर्फे वाचना-लयास आरओ भेट जालना : लायन्स क्लबकडून ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयात येणाऱ्या वाचक, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची ...

Vaccination of 138 people in Saskheda - Page 3 | सासखेड्यात १३८ जणांचे लसीकरण - पान तीन

सासखेड्यात १३८ जणांचे लसीकरण - पान तीन

Next

लायन्सतर्फे वाचना-लयास आरओ भेट

जालना : लायन्स क्लबकडून ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयात येणाऱ्या वाचक, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी आरओ संच भेट देण्यात आला आहे. उद्घाटन व लोकार्पण लायन्स क्लबचे प्रथम उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरीया यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतुल लड्डा, झोन चेअर पर्सन शाम लोया, अध्यक्षा मीनाक्षी दाड, जयश्री लड्डा, विजयकुमार दाड, अरुण मित्तल, द्वारकादास मुंदडा, रवींद्र शर्मा, रवी राऊत, कल्पना लाहोटी आदींची उपस्थिती होती.

बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

कुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगाव शिक्षक मित्रमंडळाकडून बसस्थानक परिसरात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. रोपट्यांना संरक्षक लोखंडी जाळ्या देखील लावण्यात आल्या. यावेळी विठ्ठल काळे, सुनील खोडदे, सुरेश उबाळे, महेश घुगे, सुरेश मोरे, अशोक काकडे, संभाजी शिंदे, बाळासाहेब अंबाड, महेश भोजगुडे, रमेश धरणे, प्रसाद चेके, अमर तौर, जिजा कंटुले, भाऊसाहेब कंटुले आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीकडून तलाव सांडवा मोकळा

जालना : जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील पाझर तलाव पावसामुळे पूर्ण भरला. परंतु त्याला पाणी जाण्यासाठी सांडवा नसल्याने पाळूच्या भिंतीवरून पाणी वाहत होते. त्यामुळे भिंत खचून तलाव फुटला असता. ग्रामपंचायतने शासनाच्या मदतीची वाट न बघता स्वखर्चाने जेसीबीच्या मदतीने चर खोदून त्वरित पाणी जाण्यासाठी व्यवस्था केली. यावेळी सरपंच सुभाष गिराम, तलाठी कनके, ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत गिराम, सपना सोनवणे, साळुकराम गिराम, भागवत गिराम, सय्यद शमशू, गणेश गिराम, राम गिराम, वसंत जोगदंड आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा

विरेगाव : जनतेने गणेशोत्सव साजरा करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विरेगाव येथे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मोरे म्हणाले, अद्याप कोरोना व्हायरस नष्ट झालेला नाही. गणेशोत्सव काळात गर्दीमुळे परत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. या वेळी एम. बी. वाघ, अविनाश मांटे, बी. एल. वाघमारे आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बदनापूर : बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे जि.प. सदस्य कैलास चव्हाण यांच्या वतीने येथील साईबाबा मंदिर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प. कैलास चव्हाण, तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, पंडित भुतेकर, भानुदास घुगे, सभापती बी.टी. शिंदे, उपसभापती बोचरे, श्रीराम कान्हेरे, निवृत्ती कोडोस, महादू गिते, राजू थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: Vaccination of 138 people in Saskheda - Page 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.