पिंपरी डुकरी येथे १४५ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:31+5:302021-04-10T04:29:31+5:30
शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ अंबड : रब्बी हंगामातील बहुतांश पिके शेतकऱ्यांनी काढली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी ...
शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
अंबड : रब्बी हंगामातील बहुतांश पिके शेतकऱ्यांनी काढली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. नांगरणीसह इतर कामांसाठी ट्रॅक्टरला मागणी वाढली आहे. परंतु, इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालक शेती कामासाठी अधिकचे दर सांगत आहेत. शेतीकामे करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करीत ही कामे करावी लागत आहेत.
केशकर्तनालये सुरू ठेवू देण्याची मागणी
जाफराबाद : यापूर्वीच्या लॉकडाऊनमुळे केशकर्तनालय चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता ब्रेक द चेन मुळे दुकाने पुन्हा बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे केशकर्तनालय चालकांचे आर्थिक गणित बिघडले असून, ही दुकाने नियम पाळून सुरू ठेवू द्यावीत, अशी मागणी विठ्ठल वाघमारे, निलेश वाघमारे, संतोष वाघमारे यांच्यासह इतर व्यावसायिकांनी केली आहे.