गुंडेवाडी येथे १५७ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:50+5:302021-07-03T04:19:50+5:30
जालना : जालना तालुक्यातील गुंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय व पीर पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद शाळेत कोविड-१९ ...
जालना : जालना तालुक्यातील गुंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय व पीर पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद शाळेत कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, १५७ ग्रामस्थांनी लस टोचून घेतली.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आला आहे. सुरुवातीला ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. गुंडेवाडी येथेही लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास १५७ जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच मनोहर पोटे, ग्रामसेवक अभिमन्यू खैरे, प्रा. अर्जुन गजर, पोलीसपाटील श्रीरंग लहाने, भास्कर पट्टेकर, शंकर भालेराव, कैलास गजर, गजानन गजर, संकेत वाकुडे, देवा पोटे आदींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पीर पिंपळगाव येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कबीर बेग, एस. के. कोल्हे, गुंडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कार्लेकर, प्राथमिक शिक्षक सुनील साबळे, अंगणवाडी कार्यकर्ती मंगलबाई खांडेभराड, मदतनीस विमल गजर, आशा सेविका लता जुंबड आदींनी परिश्रम घेतले.