वालसावंगी येथे ४५ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:46+5:302021-04-17T04:29:46+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण ...
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण केले जात आहे. वालसावंगी येथे शुक्रवारी ४५ जणांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. शिवाय लसीकरणावरही भर दिला आहे. यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. वालसावंगी येथेही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी केवळ ४५ जणांनी लसीकरण केले आहे. जास्तीत-जास्त ग्रामस्थांनी लसीकरण करावे, यासाठी गावात दवंडीदेखील देण्यात आली होती. तरीही ग्रामस्थांनी लसीकरणाकडे कानाडोळा केला. कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यावेळी डॉ. घनघाव, आरोग्यसेवक शहा, आरोग्यसेविका कापरे, शुभम भुते, गायकवाड, आदींची उपस्थिती होती.