८०० नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:20+5:302021-09-27T04:32:20+5:30
जालना : शहर परिसरातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष फकिरा वाघ यांनी शहर परिसरात आयोजित शिबिरांमध्ये ८०० ...
जालना : शहर परिसरातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष फकिरा वाघ यांनी शहर परिसरात आयोजित शिबिरांमध्ये ८०० नागरिकांचे लसीकरण झाले. लसीकरणानंतरही नागरिकांनी मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.
शहरासह परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून वाघ यांनी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २९ मध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन केले होते. वाघ यांनी केलेल्या जनजागृतीनंतर योगेशनगर, भाग्योदयनगर, ४८८ पोलीस कॉटर, योशोदीप नगर, सातकार्ये रूपनगर, टीव्ही सेंटर गौतम नगर येथील सटवाई तांडा परिसरातील ८०० नागरिकांचे लसीकरण झाले. यासाठी श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर सोनार, रामधन राजपूत, डॉ. गणेश वायाळ, उत्तम गोफने, एल.आर. कुलकर्णी, रत्नाकर लिपणे, वंदना भालेराव, राहुल भालमोडे, गौरव वाघ आदींनी पुढाकार घेतला.
फोटो