शहापूर येथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:54+5:302021-05-10T04:29:54+5:30
बानेगावात कोरोनाबाबत जनजागृती भोकरदन : भोकरदन तालुक्यातील बानेगाव येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ...
बानेगावात कोरोनाबाबत जनजागृती
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील बानेगाव येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी चिंचोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी जावेद शाह, अशोक गायके, सरपंच उत्तम रेवगडे आदींची उपस्थिती होती. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
जाफराबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातलेले असून, आता त्याने ग्रामीण भागातही पाय पसरविले आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी सरपंच संजय चव्हाण यांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्याकडे केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भगवान चव्हाण, पांडुरंग चव्हाण, दगडू केवट, प्रल्हाद चव्हाण आदींनी दिला आहे.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडणतंट्यात वाढ होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दारूच्या नशेत युवा पिढीही व्यसनाधीन होत असून, गावात सतत तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. महिला, मुलींनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारूविक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.