वाघ्रुळ येथे तीन दिवसांत एक हजार जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:35+5:302021-04-14T04:27:35+5:30
जालना : ग्रामस्थांनी ठरवले तर काय होऊ शकते, हे जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथील लसीकरण मोहिमेतून सिद्ध ...
जालना : ग्रामस्थांनी ठरवले तर काय होऊ शकते, हे जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथील लसीकरण मोहिमेतून सिद्ध होते. तीन दिवसांत एक हजार ८० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. याचा समारोप मंगळवारी करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुुख भास्कर अंबेकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी जो पुढाकार घेतला तो निश्चितच प्रेरणादायी आहे. शहरामध्येही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आवाहन करावे लागते. परंतु, येथे महिला व पुरुषांनी जो सहभाग घेतला, तो इतरांना शक्ती देणारा ठरल्याचे अंबेकर म्हणाले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जि. प. सदस्य बबनराव खरात, पं. स. सदस्य गजानन खरात, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, बाला परदेशी, सुधाकर खरात, संतोष खरात यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहे.