हिवराकाबली येथील केंद्रात लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:22+5:302021-04-10T04:29:22+5:30
खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या उन्हात अचानक ...
खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या उन्हात अचानक वीज गुल होण्याचे प्रमाण मात्र कायम आहे. वीज गायब झाल्याने अबाल-वृध्दांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय विविध कामकाजावरही याचा परिणाम होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
मठपिंपळगाव रस्त्याचे काम करण्याची मागणी
अंबड : तालुक्यातील मठपिंपळगाव येथील अंबड- जालना महामार्गावरील फाटा ते गावापर्यंत रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. खराब रस्त्यामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधितांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
प्रशासकीय दुर्लक्षामुळे अवैध गुटखा विक्री सुरू
मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे. शासनाने गुटखा विक्रीवर कायदेशीर बंधने घातली आहेत. परंतु, अवैधरीत्या परराज्यातून गुटख्याची आयात केली जाते. परराज्यातून येणारा गुटखा जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पोहोचविला जातो. याकडे अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कोरोनातील सूचनांचे अनेकांकडून उल्लंघन
जालना : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मास्कचा वापर, सुरक्षित अंतर यासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु, शहरांतर्गत फिरणारे अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानेही उघडी ठेवली जात असल्याचे चित्र दिसत आहे.