टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:56+5:302021-03-07T04:27:56+5:30
या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने शनिवारपासून याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी ...
या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने शनिवारपासून याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी ६० वर्षांवरील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रुग्णालयात जावून कोरोनाची लस घेतली. याशिवाय ४५ वर्षांवरील विविध आजारांनी ग्रस्त असलेले नागरिक ही लस घेण्यासाठी येत आहेत.
सुटीचे दिवस वगळता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे लसीकरण केंद्र सुरू राहणार असून, टेंभुर्णीसह परिसरातील पात्र लाभार्थी नागरिकांनी आपले आधारकार्ड व मोबाइल सोबत आणून लसीकरण करून घ्यावे. ही लस सुरक्षित असून, याचे कुठलेही दुष्परिणाम नाही. शिवाय लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी आणखी दुसरी लस घ्यावी लागणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश साबळे यांनी दिली.
या लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश साबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ कार्यालयीन अधीक्षक धोंडीराम कौटकर, परिचारिका रोहिनी सुखदाने, पूजा सपकाळ, मल्हारी उमाप, शरद सुर्वे आदी पुढाकार घेत आहेत.