कोरोना योद्ध्यांना लसीची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:57+5:302021-01-17T04:26:57+5:30

अंबड : येथील मत्स्योदरी विद्यालयातील लसीकरण केंद्रात शनिवारी सकाळी उपजिल्हा रूग्णालयातील डॉ. इरफान शेख यांना कोरोनाचा डोस देवून लसीकरणास ...

Vaccine dose to corona warriors | कोरोना योद्ध्यांना लसीची मात्रा

कोरोना योद्ध्यांना लसीची मात्रा

googlenewsNext

अंबड : येथील मत्स्योदरी विद्यालयातील लसीकरण केंद्रात शनिवारी सकाळी उपजिल्हा रूग्णालयातील डॉ. इरफान शेख यांना कोरोनाचा डोस देवून लसीकरणास सुरूवात करण्यात आली. कोरोना योद्ध्यांना लसीकरणाचा पहिला डोस मिळू लागल्याने उपस्थित लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

अंबड येथे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेस प्रारंभ झाला. लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तलवाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास रोडे, नोडल अधिकारी डॉ. तलवाडकर यांची उपस्थिती होती.

तालुक्यात एकूण १०२० आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात शंभर लाभार्थ्यांना कोरोना लसीकरणासाठी बोलाविण्यात आले होते. लसीकरणासाठी येणाऱ्यांचे यादीत नाव आहे का ? याची खात्री करून त्यांना लसीकरण विभागात सोडले जात होते. लस टोचल्यानंतर अर्धा तास निरीक्षण खोलीत संबंधितांना थांबविण्यात आले. परिचारिका मोनिका गावडे यांनी पहिला डोस डॉ. इरफान शेख यांना दिला. त्यानंतर येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना वेळोवेळी लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर काही त्रास होतो का याचीही पाहणी केली असल्याचे डॉ. जे. ए. तलवाडकर यांनी सांगितले. तर लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याचा अभिमान असल्याचे डॉ. दयानंद पांढरे म्हणाले. लसीकरणासाठी डॉ. पांढरे, डॉ. गंगवाल, डॉ. टकले, राहुल झेंडेकर, विनोद गाडे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ही लस पूर्णत: सुरक्षित असून, डोस घेतल्यानंतर मला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही. त्यामुळे ज्यांना लसीकरणासाठी बोलाविण्यात आले आहे, त्यांनी आपल्या वेळेत केंद्रात जावून लसीकरण करून घ्यावे.

डॉ. इरफान शेख, अंबड

आम्ही मनात कोणताही विचार न आणता लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, आम्हाला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

मयुर साडेगावकर

आरोग्य सहायक

लसीकरण मोहिम यशस्वी झाली आहे. आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार लस घेतली असून, त्यानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबलो. आम्हाला या लसीमुळे कोणताही त्रास झालेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

दुर्गा खांडेकर, परिचारिका

लसीबाबत काहीजण अफवा परसवित आहेत. परंतु, आम्ही लस घेतली असून, त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. कोरोनाच्या लढ्यात सर्व अधिकारी, कर्मचाºयांसह नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून लसीकरण यशस्वी करावे.

आशा शेजूळ, वरिष्ठ लिपिक

Web Title: Vaccine dose to corona warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.