‘वारी लाल परी’तून मांडला ‘एसटी’चा आजवरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:09 AM2019-07-25T01:09:34+5:302019-07-25T01:10:37+5:30

बुधवारी जालना येथील बसस्थानकात आलेल्या चित्ररथाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.

The 'Vari Lal Pari' presents the journey of ST today | ‘वारी लाल परी’तून मांडला ‘एसटी’चा आजवरचा प्रवास

‘वारी लाल परी’तून मांडला ‘एसटी’चा आजवरचा प्रवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एसटी महामंडळाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी राज्यातील १२ सुशिक्षित तरूणांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि ‘बस फॉर अस फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. बुधवारी जालना येथील बसस्थानकात आलेल्या या चित्ररथाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.
या चित्ररथाचे उद्घाटन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी झाडबुके, विभाग नियंत्रक यू. बी. वावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेव्हूल, जालना आगारप्रमुख पंडित चव्हाण, यंत्र अभियंता चालन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या चित्ररथाला दिवसभरात सरासरी तीन हजार प्रवाशांनी भेट देऊन मागील पाच वर्षात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी केलेल्या आमूलाग्र बदलाची माहिती जाणून घेतली.
‘बस फॉर अस फाऊंडेशन’ हा एसटीवर नितांत प्रेम करणाऱ्या अशा १२ तरूणांचा समूह आहे. या गु्रपमधील तरूण अगदी लहानपणापासून एसटीवर प्रेम करत आहेत. एसटीचा स्पर्धेच्या युगात प्रचार व प्रसाह व्हावा, यासाठी एसटीला जगासमोर मांडण्यासाठी २०१६ मध्ये या तरूणांनी ‘एसटी विश्व’ या अनोख्या प्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. यामध्ये १९४८ म्हणजे एसटी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत संपूर्ण इतिहास मांडला. सुरूवातीला बसस्थानकात भरणाºया प्रदर्शनातून यंदा प्रथमच ‘वारी लाल परीची’ ही अनोखी संकल्पना अंमलात आली आहे. यंदा राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ५० शहरात ५० दिवसांमध्ये हा चित्ररथ फिरणार आहे. जालन्यातील या चित्ररथाचा बुधवारी ३८ वा दिवस होता. यासाठी ‘बस फॉर अस फाउंडेशन’चे सुमेघ देशभ्रतार, सय्यम धारव, रवि मळगे, सुशांत अवसरे यांनी पुढाकार घेतला आहे.
एसटी महामंडळाचा आजवर झालेला प्रवास या अभियानात मांडण्यात आला आहे. या उपक्रमाला विभागीय कार्यालय व जालना बसस्थानकातील अधिकारी- पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
एसटी सेवा : आमूलाग्र बदल
गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या सेवेमध्ये अनेक आमूलाग्र बदल झालेले आहेत. यात शिवशाही सेवा, नवीन एम. एस. बांधणी, विठाई सेवा, रातराणी विनावातानुकूलित शयनयान सेवा, एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सेवा इ. सेवा सुविधांविषयी समज, गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या या अनोख्या ‘वारी लाल परीची’ या एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: The 'Vari Lal Pari' presents the journey of ST today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.