भोकरदन शहरात विविध उपक्रमांनी संत नरहरी जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:47 AM2019-08-14T00:47:12+5:302019-08-14T00:50:25+5:30
संत शिरोमणी नरहरी महाराजांचा आदर्श डोळ््यासमोर समोर ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : संत शिरोमणी नरहरी महाराजांचा आदर्श डोळ््यासमोर समोर ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.
शहरातील सराफा असोसिएशन आणि सोनार बांधवांतर्फे श्रीकृष्ण मंगल कार्यालयात संत नरहरी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त गुणंवत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, मनिष श्रीवास्तव, हभप. संतोष महाराज आढावणे, महादूसिंग राजपूत, रणवीरसिंह देशमुख, हुकुमसिंह चुडावत यांची उपस्थिती होती. समाजबांधवांनी संत नरहरी महाराजांच्या विचारानुसार मार्गक्रमण करावे, असे दानवे यांनी
सांगितले. यावेळी नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी जयंतीनिमित्त समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना सर्वांनी एकत्र येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांतर्फे सराफा बाजारपासून वाजत- गाजत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोहन हिवरकर, मनोज दुसाने, नवथान खरोटे, किशोर सराफ, नंदू पवार, कृष्णा हिवरकर, किशोर हिवरकर, अशोक सराफ, वसंत सराफ, शारदा हिवरकर, रोहिणी सराफ, गंगाताई हिवरकर, सुरेखा पळसकर आदीसह समाजबांधवांची उपस्थिती होती.