दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:57+5:302020-12-31T04:29:57+5:30
रांजणी : दत्त जयंती निमित्त करडगाव (ता. घनसावंगी) येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी दत्त जयंती, संन्यास दिक्षा, पंचावतार ...
रांजणी : दत्त जयंती निमित्त करडगाव (ता. घनसावंगी) येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी दत्त जयंती, संन्यास दिक्षा, पंचावतार व धर्म सभा आयोजित करण्यात आली होती. प्रा. प्रतिभा पाटील यांनी चक्रधर स्वामींविषयी माहिती दिली. महंत सुदाम शास्त्री यांनी लीळा चरीत्र या महानुभाव पंथाच्या धर्म ग्रंथातील लीळा समजावून सांगीतल्या. कार्यक्रमाला रमेश मुळे (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. सुशीला फोके व शारदा मुळे यांनी सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभुंच्या तत्वज्ञानाला अनुसरून स्वेच्छेने संन्यास धर्मात पदार्पण केले. कार्यक्रमाला आत्मारम ईघारे, रामचंद्र घुले, विलासराव उगले, नाजिम पठाण, अंकुश फोके, अवधुत खडके आदींची उपस्थिती होती. दत्त मंदीर करडगाव संस्थानाचे प्रमुख महंत कृष्णराज बाबा साळकर यांनी आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळ : करडगाव येथील दत्त मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महंत सुदाम शास्त्री महाराज यांच्यासह इतर.