जालना तालुक्यावर वरुणराजा रुसलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:20 AM2019-07-02T01:20:06+5:302019-07-02T01:20:21+5:30
जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. तर काही गावांमध्ये जेमतेम पावसावरच पेरणी करण्यात आली. पाऊस नसल्यामुळे शेतकरीही दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले आहे.
गती वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस पडले अशी आशा सर्वांनाच होती. जून महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला. ज्या भागात पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु, तालुक्याच्या अर्ध्या भागात अद्यापही वरुण राजा बरसला नाही.
तालुक्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ६० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱ्यांनी १० ते १२ मिलिमीटर पाऊसावरच पेरणी केली. सध्या पावसाने उघडीप दिलेल्याने शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
तालुक्यातील कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, भाटेपूरी, हिवरा रोषणगाव, हडप सावरगाव, रामनगर, उटवद, बाजीउम्रद, साळेगाव, जळगाव, वखारी, नाव्हा, घोडेगाव, धानोरा, बापकळ यासह इतर गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसून शेतक-यांची चिंता कायम आहे.