जालन्याच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:13 PM2018-12-20T12:13:58+5:302018-12-20T12:14:17+5:30
भाजीपाला : दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी भाजीपाला मंडईत भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्याने काटेरी वांग्याला बुधवारी दुप्पट भाव मिळाला.
दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढल्याने बुधवारी भरलेल्या आठवडी बाजारात जालना आणि बदनापूर तालुक्यातील गावातील भेंडी, काटेरी वांगे, गवार, वाटाणा, हिरवी मिरची आदी आवक झाली होती; मात्र मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक बाजारात कमी होती.
यामुळे वांग्याला १००० ते १२०० रुपये दर मिळाला. भेंडीला ३०० ते ४०० रुपये, वाटाणा शेंगा १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला. मेथीला बुधवारी १०० ते १५० रुपये शेकडा भाव मिळाला. कांद्याची परिस्थिती अद्यापही बिकटच आहे. कांद्याला ४०० ते १००० रुपये भाव मिळाला.