जालन्यातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:43 AM2018-11-21T11:43:38+5:302018-11-21T12:02:35+5:30
फळे/ भाज्या : जालन्यातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव स्थिर
जालन्यातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव स्थिर असले तरी, टोमॅटोच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे, तर पत्ताकोबी थेट १० रुपये किलोवर पोहोचली आहे. सिमला मिरचीच्या घाऊक दरात १० रुपयांची वाढ झाली आहे.
घाऊक बाजारपेठेत वांगी आणि टोमॅटोचे भाव हे १५० रुपये, २०० रुपये कॅरेट असून, कोथिंबीर, मेथी १०० ते १२० रुपये शंभरजुडी हे भाव गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहेत. काकडीचे दर २०० ते २५० रुपये कॅरेट आहेत. गवार २० रुपये किलो आहेत. आता चातुर्मास संपत आला असून, चातुर्मास संपताच कांदा आणि लसणाचे दर वाढतील, असे सांगण्यात आले. आज कांदा ६०० ते ११०० रुपये क्विंटल होता.
सध्या बाजारात पेरूची मोठी आवक वाढली असून, भाव ३० ते ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सध्या हिवाळा असल्याने सफरचंदाला मोठी मागणी असून, मोसंबी, संत्रा आदींची मागणी मात्र घटल्याचे सांगण्यात आले.