दोघांच्या वादात मध्यस्थाचा बळी; मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 11:46 AM2021-08-06T11:46:23+5:302021-08-06T11:49:08+5:30

Murder Case in Bhokardan : हॉटेल चालक असलेल्या मृत तरुणाचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

Victim of mediation in two's dispute; Murder of a young man who went to settle a friend's quarrel | दोघांच्या वादात मध्यस्थाचा बळी; मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

दोघांच्या वादात मध्यस्थाचा बळी; मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देजुने वाद मिटवून टाकू म्हणून आरोपीने बोलावले भांडण मिटविण्यासाठी मित्रासोबत तरुण गेला

भोकरदन : मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी ( दि. 5 ) रात्री 10 वाजता भोकरदन शहरात घडली. सागर भारत बदर ( 27, रा. वालसा खालसा  )  असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हॉटेल चालक होता. दिड महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. 

या बाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री सागर बदर हा मित्र कैलास गजानन फुके ( रा. फत्तेपुर) याच्या लहान भाऊ सुनीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भोकरदन-जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेवण करण्यापूर्वी कैलासला जुने वाद असलेल्या योगेश पुंजाजी फुकेने फोन केला. आपल्यातील जुने वाद मिटून टाकू तू फत्तेपुर रोडवरील 132 केव्ही केंद्राजवळ ये असे सांगत योगेशने कैलासला बोलावून घेतले. कैलासने सागरला सोबत घेत दुचाकीवरून १३२ केव्ही केंद्र गाठले. येथे योगेशसोबत हनुमंत फुके देखील होता.

यावेळी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, सागर व इतरांनी भांडण मिटवले. यानंतर कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला, त्याच्यामागे सागर बसण्यासाठी निघाला. याच दरम्यान योगेशने सागरच्या पोटात चाकूने खुपसला. अचानक झालेल्या वारामुळे सागर खाली कोसळला. हे पाहताच योगेशने तेथून पळ काढला. कैलास व इतरांनी सागरला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त होत असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्याला जालना येथे पाठवले. मात्र, जालना येथे पोहचण्यापूर्वीच  रात्री 11 वाजेच्या दरम्यान सागरचा मृत्यू झाला. या पर्कारणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली असून आरोपी फरार आहे. 

Web Title: Victim of mediation in two's dispute; Murder of a young man who went to settle a friend's quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.