खराब रस्त्याने घेतला शिक्षकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:57 PM2017-12-03T23:57:46+5:302017-12-03T23:57:57+5:30
खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. राजूर-टेंभुर्णी मार्गावरील खामखेडा पाटीजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. रवींद्र भिकनराव वायाळ (३५, चिंचखेडा, जि. देऊळगावराजा, ह.मु. राजूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. राजूर-टेंभुर्णी मार्गावरील खामखेडा पाटीजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. रवींद्र भिकनराव वायाळ (३५, चिंचखेडा, जि. देऊळगावराजा, ह.मु. राजूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रवींद्र वायाळ हे सध्या कुटुंबियांसह राजूरला राहतात. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुचाकीने (क्र. एमएच.२१-आर.ए.८१९४) पिपळगांव थोटे येथे जात होते.
सध्या राजूर ते टेंभुर्णी रस्त्याचे काम सुरू आहे. खोदलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने खामखेडा पाटीजवळील टॉवरजवळ दुचाकी खड्ड्यात पडली. यात वायाळ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजूर पोलीस चौकीचे जमादार विष्णू बुनगे, संतोष वाढेकर, प्रशांत लोखंडे, प्रताप चव्हाण यानी पंचनामा केला. वायाळ हे राजूर येथील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी राजूर पोलीस चौकीत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.