महिलांच्या पुढाकाराने गाव पाणीदार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:52 AM2019-01-20T00:52:09+5:302019-01-20T00:52:39+5:30

महिलांनी मनावर घेतले तर गाव पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत पाणी फाऊंडेशनचे मराठवाडा विभागाचे समन्वयक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले

The village will be developed by the initiative of women | महिलांच्या पुढाकाराने गाव पाणीदार होईल

महिलांच्या पुढाकाराने गाव पाणीदार होईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : गावातील महिला एकत्र आल्या तर जलक्रांती होऊन गाव पाणीदार होण्यास मदत होईल, महिला व पाणी एका नाण्याच्या दोन बाजू असून पाण्याशी महिलांचे घनिष्ट नाते आहे. यामुळे महिलांनी मनावर घेतले तर गाव पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत पाणी फाऊंडेशनचे मराठवाडा विभागाचे समन्वयक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले आहे.
पाणी फाऊंडेशनतर्फे जाफराबाद तालुक्यातील पोखरी येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धच्या अनुषंगाने शनिवारी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान जिल्हा समन्वयक प्रल्हाद आरसुळ, सरपंच वेणुबाई कांबळे, तालुका समन्वयक बी. एस. सय्यद, ज्ञानेश्वर इधाटे, ग्रामसेवक सोनाली झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान महिलांचा जलक्रांतीसाठी असलेला पुढाकार पाहून गावातील सर्व नागरिकांच्या वतीने लोक सहभागातून दोन हजार लिटर डिझेल देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या प्रसंगी ग्रा. प. सदस्य कृष्णा पाचरणे यांनी ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत स्वत:चे पोकलेन मशीन मोफत
गावातील कामासाठी देण्याचे जाहीर केले.
गावातील परिवर्तन सामाजिक युवक ग्रुपतर्फे मोठ्या प्रमाणात शोषखड्डे केले. यामुळेच स्पर्धा यशस्वितेसाठी मदत होईल. दरम्यान महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गावातील सर्वजण एकत्र आले तरच पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यासाठी वॉटर कप ही संधी आहे. असे मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: The village will be developed by the initiative of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.