सातेफळ शाळेतील अभियानास ग्रामस्थांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:16+5:302021-09-27T04:32:16+5:30

या अभियानातून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षक व समाज मिळून प्रयत्न करीत आहेत. यासाठी समाजातील अनेक ...

Villagers respond to Satephal school campaign | सातेफळ शाळेतील अभियानास ग्रामस्थांचा प्रतिसाद

सातेफळ शाळेतील अभियानास ग्रामस्थांचा प्रतिसाद

Next

या अभियानातून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षक व समाज मिळून प्रयत्न करीत आहेत. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे हात शाळेसाठी सरसावले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास पन्नास हजार रुपये किमतीच्या भेटवस्तू गेल्या महिनाभरात शाळेस मिळाल्या आहेत. शाळा भौतिकदृष्ट्या सुसज्ज व्हावी, या दृष्टिकोनातून सातेफळ गावचे तलाठी विजय गरड यांनी शाळेला पंधरा हजार रुपये किमतीचा मल्टी फंक्शन प्रिंटर दिला आहे. शिवाय संगणक टेबल, संगणक मॉनिटर, भिंतीवरील जम्बो घड्याळ, डायस, वर्गनिहाय कचराकुंड्या आदी साहित्य ग्रामस्थांनी शाळेला भेट दिले आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तू बनकर, सरपंच भागूबाई बनकर, उपसरपंच निवृत्ती बनकर, पोलीसपाटील विलास बनकर, तलाठी विजय गरड, मुख्याध्यापक एस. डी. निश्चळ, किसनराव पुंगळे, सर्जेराव बनकर, मदन घुगे, प्रभू बनकर, कल्याणराव बनकर, सुभाष बनकर, शिक्षक बद्रीनाथ जायभाये, गणेश सवडे, रमेश सोनुने, राजू पवार, जगन बुरकुल आदींनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Villagers respond to Satephal school campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.