निवडीबद्दल विरेंद्र धोका यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:23 AM2021-06-02T04:23:01+5:302021-06-02T04:23:01+5:30
कारवाईची मागणी भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गुटखा विक्रीसह जुगार जोमात सुरू आहे. अवैध धंद्यांमुळे कायदा - सुव्यवस्थेचा ...
कारवाईची मागणी
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गुटखा विक्रीसह जुगार जोमात सुरू आहे. अवैध धंद्यांमुळे कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय युवा पिढीही व्यसनाधीन होत असून, अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. संबंधितांनी लक्ष देऊन कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी महिलावर्गातून केली जात आहे.
राममूर्ती येथे जयंती साजरी
जालना : जालना तालुक्यातील राममूर्ती येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय मल्हार युवा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
तौर कुटुंबीयांची मराठा क्रांती भवनाला मदत
परतूर : तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व युवा उद्योजक विक्रम तौर यांनी परतूर येथे साकारत असलेल्या अद्ययावत मराठा क्रांती भवन उभारणीसाठी ११ हजार रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी डॉ. रवींद्र बरकुले, योगेश मुजमुले, पांडुरंग नवल, सचिन खरात, संभाजी तिडके, शाम बरकुले, उत्तम पवार, अशोक तनपुरे, शुभम कठोरे यांची उपस्थिती होती. तौर यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
अंबड येथे जयंतीनिमित्त रक्तदान
अंबड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे जगदंबा प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कैलास जिगे, शाम शिरगिरे, गजानन खेकडे, नवनाथ जिगे, विशाल खेकडे, फुलचंद काळे, अभिषेक जिगे, शरद जिगे, कुणाल आरगडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन
जालना : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार प्रशांत पडघन, नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, नायब तहसीलदार मयुरा पेरे, संपदा कुलकर्णी, छाया कुलकर्णी यांच्यासह अधिकारी - कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
सेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगाव व परिसरात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण - तंट्यात वाढ होत असून, कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देऊन अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालक हैराण
जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उडणारी धूळ अनेकांच्या दुकानात जात असल्याने साहित्य खराब होत आहे, शिवाय वाहन चालकांनाही वाहने चालविताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब पाहता, संबंधितांनी लक्ष देऊन शहरांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.
लक्ष्मीकांतनगरात कोविड लसीकरणाला सुरुवात
जालना : तालुक्यातील लक्ष्मीकांतनगर, इंदेवाडी येथे कोविड १९ लसीकरण सत्राची सुरुवात शनिवारी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, सरपंच सर्जेराव शिंदे, सुमित वाघमारे, आबा सूर्यवंशी, गजानन शिंदे, हनुमान शिंदे, सरपंच राहुल गवारे, लाला पठाण, ग्रामसेवक आर. बी. कोथळकर, उद्धव निकम, डॉ. कुरेशी, डॉ. स्नेहल खरावन, एस. यू. भगत आदींची उपस्थिती होती.