जालन्यात मतमोजणी कार्यालयाजवळ होईल टॅÑफिक जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:45 AM2019-05-23T00:45:02+5:302019-05-23T00:45:26+5:30
जालना : जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीमध्ये होणार आहे. या निकालासाठी पोलीस विभागाच्या वतीने ...
जालना : जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीमध्ये होणार आहे. या निकालासाठी पोलीस विभागाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, औरंगाबाद मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ३ अधिकारी व ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. औरंगाबाद मार्गावरील संकेत फूड कंपनीमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ३ अधिकारी व ४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच मतमोजणी कार्यालयापासून ६०० मीटरपर्यंत वाहने उभे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, वाहतूक ठप्प झाली तर दुचाकी उचलण्यासाठी एक टेम्पो ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पर्यायी मार्ग हे वापरा
या मार्गावर एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. एकेरी मार्गानेच वाहनधारकांना वाहने चालवावी लागणार आहेत. या ठिकाणी वाहतूक ठप्प होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ३ अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, वाहनधारकांनी मतमोजणी कार्यालयाजवळ वाहने उभी करु नयेत, असे आवाहन पो.नि. काकडे यांनी केले आहे.