वाघोडा ग्रामस्थांचा मंठा तहसीलवर ठिय्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:26 AM2019-04-10T00:26:06+5:302019-04-10T00:26:20+5:30
पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वाघोडा गावांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतने टँकरची मागणी केली होती. प्रशासनाकडून टँकर मंजूर करण्यात आले परंतु टँकरने केवळ चार ते पाच दिवस पाणीपुरवठा करण्यात आला आणि अचानक टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी उन्हामध्ये भटकंती करण्याची वेळ आली. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या वाघोडा गावातील महिला आणि पुरुषांनी तहसील कार्यालयामध्ये टँकर पूर्ववत सुरू करण्यासाठी हे आंदोलन केले सादरील त्यांकर त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनीच बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तात्काळ टँकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधितांनी यावेळी दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब लोमटे यांनी केले.
यावेळी नामदेव शिंदे हे लक्ष्मण घुंगरात, विजय माला लोमटे, सुमनबाई घुंगरात, राधाकिसन लोमटे, रेशमाबाई घुगे, गंगासागर लोमटे, शिवानंद घुमर, कलावती शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघोडा या गावांमध्ये बाराही महिने पाणीटंचाई असते. त्यातच आमचे सुरु केलेले त्यानंतर का बंद केले, याचा जाब विचारण्यासाठी गावातील महिला व नागरिक तहसील कार्यालयामध्ये आले होते. उपविभागीय अधिकारी यांनी हेतूपुरस्सर टँकर बंद केल्याने आम्हाला ना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित महिला व पुरुष यांनी केला.