भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई रस्त्याची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:13+5:302020-12-25T04:25:13+5:30

रस्त्यावरील डांबर उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष पारध : दोन ते अडीच वर्षांपूर्वीच भोकरदन ते पिंपळगाव ...

Wait for Bhokardan-Pimpalgaon Renukai road | भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई रस्त्याची लागली वाट

भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई रस्त्याची लागली वाट

Next

रस्त्यावरील डांबर उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

पारध : दोन ते अडीच वर्षांपूर्वीच भोकरदन ते पिंपळगाव रेणुकाई या राज्यमार्गाचे काम करण्यात आले होते. मात्र, काम गुणवत्तापूर्ण न झाल्याने काही वर्षांतच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई या २१ किलोमीटरच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले होते. खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डे, अशी दुरवस्था झाली होती. यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रस्त्याचे काम करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार संतोष दानवे यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून आणला. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. या रस्त्याचे काम होऊन दोन ते अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु सध्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्वक करून घेणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळेच दोन वर्षांतच रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणेही अवघड झाले आहे. या रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी होत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने पिंपळगाव रेणुकाई येथून भोकरदनला जाण्यासाठी तासभराचा अवधी लागत आहे. सध्या जागोजागी रस्ता उखडल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे व पाठदुखीचे आजार बळावले आहेत.

दोन वर्षांपूर्वीच भोकरदन ते पिंपळगाव रेणुकाई या रस्त्याचे काम झाले होते. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते; परंतु दोन वर्षांतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणेही अवघड झाले आहे. या रस्त्याचे काम करण्यात यावे.

-समाधान डोईफोडे, वाहनधारक

फोटो ओळी

पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन रस्त्यावर अशा प्रकारे मोठाले खड्डे पडले आहेत.

---------------

Web Title: Wait for Bhokardan-Pimpalgaon Renukai road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.