एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:30 AM2020-12-31T04:30:13+5:302020-12-31T04:30:13+5:30

शालेय पातळीवर इंटरमिजिएट व एलिमेंटरी या शासकीय चित्रकला परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. यंदा कला संचालनालयाकडून अद्यापही या बाबतीत कोणताही ...

Waiting for Elementary, Intermediate Exam Schedule | एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा

Next

शालेय पातळीवर इंटरमिजिएट व एलिमेंटरी या शासकीय चित्रकला परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. यंदा कला संचालनालयाकडून अद्यापही या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच ज्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षा द्यायची होती, त्यांनी सरावही सुरू केलेला आहे. आता त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुढील व्यावसायिक व शैक्षणिक प्रवेशासाठी या परीक्षांचे अतिरिक्त गुण मिळत असल्याने या गुणांचे काय होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस व इतर परीक्षांच्या आवेदन पत्राचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे कला संचालनालयाकडून लवकरात-लवकर परीक्षेबाबत स्पष्टता होण्याची गरज आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीमध्ये श्रेणीनिहाय अतिरिक्त गुण मिळतात; पण वेळापत्रक जाहीर नसल्याने व परीक्षेबाबत अस्पष्टता असल्याने चित्रकला परीक्षेच्या अतिरिक्त गुणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कला संचालनालयाकडून घेतल्या गेलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट- २०१८ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अद्यापही उपलब्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

कोट

इंटरमिजिएट व एलिमेंटरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेबरोबरच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त गुण असतात. या अतिरिक्त गुणांबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान न करता कला संचालनालयाकडून लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर होणे गरजेचे आहे.

जे. जे. साबळे, कला शिक्षक, श्री गुरुदेव विद्यामंदिर, वडीगोद्री.

इंटरमिजिएट व एलिमेंटरी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या परीक्षेचे गुण व्यावसायिक व शैक्षणिक प्रवेशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लवकरात- लवकर कला संचालनालयाकडून परीक्षेचे वेळापत्रक प्रसारित करावे.

साक्षी आटोळे, विद्यार्थिनी

Web Title: Waiting for Elementary, Intermediate Exam Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.