जुन्या गोदामाची भिंत कोसळून दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:42 AM2018-08-10T00:42:43+5:302018-08-10T00:42:54+5:30

जुना मोंढा परिसरातील सूरजचंद जांगडा आणि उत्तमचंद धोका यांच्या दुकानांना लागून असलेल्या जुन्या गोदामाची भिंत गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अचानक कोसळल्याने तेथे काम करत असलेले दोन मजूर जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले

The wall of the old godown collapsed and killed two people | जुन्या गोदामाची भिंत कोसळून दोन जण ठार

जुन्या गोदामाची भिंत कोसळून दोन जण ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जुना मोंढा परिसरातील सूरजचंद जांगडा आणि उत्तमचंद धोका यांच्या दुकानांना लागून असलेल्या जुन्या गोदामाची भिंत गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अचानक कोसळल्याने तेथे काम करत असलेले दोन मजूर जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल तसेच जेसीबीच्या मदतीने मृतदेह तसेच जखमींना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. या दुर्घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
मोंढा परिसरात धोका यांच्या दुकानाच्या मागील बाजूस बांधकाम सुरू होते. त्याचवेळी जवळ असलेल्या जीर्ण गोदामाची भिंत सकाळी अचानक कोसळली. यात ढिगाºयाखाली दबले गेल्याने प्रकाश लक्ष्मणराव खंदारे (रा. गोंदेगाव, ४७) आणि काकासाहेब देवराव कबाडे (५३ रा. राळाहिवरा) हे दोघे जागीच ठार झाले. तर सुधाकर नामदेव लहाने शिवाजी चोखाजी लहाने आणि बद्रीनाथ वाकोडे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सदर बाजार पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात आली असून, बांधकाम करताना योग्य ती खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस म्हणाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मुख्याधिकारी खांडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातून जाणारे दीपक भुरेवाल, संजय भगत तसेच मेघराज चौधरी यांनी कुठलीही पर्वा न करता ढिगाºयाखाली दबलेल्या जखमींनी काढण्यासाठी मदत केली. त्यांनी तातडीने जेसीबी मागवून ढिगारा बाजूला केला. तसेच रूग्णवाहिकांना कळवून जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मदतीला परिसरातील अनेकांनी हातभार लावला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राऊत यांनी भेट दिली.

Web Title: The wall of the old godown collapsed and killed two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.