उपशावर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:01 AM2018-08-20T01:01:43+5:302018-08-20T01:02:38+5:30

अवैध वाळूचा उपसा करून त्याची राजरोसपणे विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत आहे. असे असताना पोलीस आणि महसूल प्रशासन त्या यंत्रणेसमासेर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे शेवटी जिल्ह्याचे कॅप्टन म्हणविणाऱ्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी थेट शनिवारी मैदानात उतरून वाळू घाटांना भेटी दिल्याने खळबळ उडाली आहे.

Watch on sand digging | उपशावर करडी नजर

उपशावर करडी नजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैध वाळूचा उपसा करून त्याची राजरोसपणे विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत आहे. असे असताना पोलीस आणि महसूल प्रशासन त्या यंत्रणेसमासेर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे शेवटी जिल्ह्याचे कॅप्टन म्हणविणाऱ्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी थेट शनिवारी मैदानात उतरून वाळू घाटांना भेटी दिल्याने खळबळ उडाली आहे. या वाळू पट्ट्यातून शासनाचा मोठ्या प्रमाणावर गौण खनिज बुडाला आहे. तर वाळू माफियांची चांदी झाली आहे.
जिल्ह्यातील गोदावरी काठासह पूर्णा, कंडलिका, घाणेवाडी पसिरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा केलो जात आहे. हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे सुरू असल्याने रस्त्यांची चाळणी झाली आहे. मोठ्या हायवा ट्रकमधून ही वाळू वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या वाळू वाहतुकीत स्थानिक गावपातळीवर विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते गुंतले असल्याने वाळू माफियांची चलती आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी यापुढेही अशीच धडक कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे.
लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात
वाळू माफियांचा विमोड करताना महसूल आणि पोलीसांसमोर आजही मोठे आव्हान राहणार आहे. थातूरमातून कारवाई करून वाळू माफियांवर कारवाई केल्याची माहिती गौण खनिज विभागाकडून देण्यात येते. मात्र यापूर्वी अनेक ठेकेदारांकडे बनावट पावती पुस्तक आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गौण खनिज विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही काहीच साध्य होत नसल्याचे म्हणणे शनिवारी परिसरातील नागरिकांनी सांगितले. वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सात ते आठ अधिका-यांचे एक फिरते पथक तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही बाब लक्षात घेऊन शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी कुणालाही दौ-याची खबर न लागू देता थेट भादली, गुंज आणि शिवणगाव परिसरात भेट दिली. यामुळे वाळू माफियांसह प्रशासनही हादरले. जिल्ह्याचे सर्वेसर्वा थेट मैदानात उतल्याने काहीच करता आले नाही.

Web Title: Watch on sand digging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.