जैन संघटनेच्या वतीने जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:59+5:302021-07-21T04:20:59+5:30
अभिवादन कार्यक्रम जालना : येथील श्री रेणुकादेवी कौशल्य विकास संस्थेत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात ...
अभिवादन कार्यक्रम
जालना : येथील श्री रेणुकादेवी कौशल्य विकास संस्थेत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी संचालिका छाया देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
नंदा पवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
जालना : शहरातील सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांची जालना जिल्हा काँग्रेस सफाई कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी ही नियुक्ती केली. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी शेख महेमूद, राम सावंत, अक्षय गोरंट्याल, अरुण घडलींग, राहुल रत्नपारखे, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.
खोमणे महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
जालना : कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. चंद्ररेखा गोस्वामी यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. अश्विनी क्षीरसागर, प्रा. गजानन कदम, स्वाती पुराणिक, मेघना पत्की, अविनाश छडीदार व इतर कर्मचारी उपस्थित होते.
धावेडी शाळेत २५० वृक्षांची लागवड
जालना : ग्रामपंचायत धावेडी व जि. प. शाळेच्या संयुक्त विद्यमाने २५० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. गट विकास अधिकारी एस. आर. कुलकर्णी, विस्ताराधिकारी पंचायत चव्हाण, सरपंच प्रभाकर विटेकर, निवृत्ती साबळे, ग्रामसेविका डोईफोडे, प्रभारी मुख्याध्यापक देवेंद्र बारगजे, देशपांडे, सहशिक्षक सुदर्शन वाघ, अंबादास गुरव आदींची प्रमुख उपस्थित होती.
वाढती महागाई कमी करण्याची मागणी
जाफराबाद : वाढती महागाई कमी करण्यात यावी, अशी मागणी वीर किसान पार्टी (इंडिया)चे संस्थापक अध्यक्ष गुलाब गवळी यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तातेराव गायकवाड, सत्यम् उरफाटे, राम ससाने, रामेश्वर डोके, संदीप पालवे, नारायण पगारे, अनिल गवळी, गंगाबाई वाढेकर, संगीता दौंगे आदी उपस्थित होते.
राजूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
राजूर : राजूर येथील श्री गणपती माध्यमिक इंग्रजी व मराठी माध्यमाचा निकाल याही वर्षी सलग सहाव्यांदा १०० टक्के लागला असून, या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात वैष्णवी संदीप पडोळ, पल्लवी रामा सपाटे, साक्षी दाभाडे, श्रेया बारोकर, अजय बावणे, हर्षल वसंता कोमटे, अजय गिरणारे, अभिषेक इंगळे, प्रतीक मिसाळ या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खराब रस्त्यांमुळे चालकांची कसरत
जाफराबाद : तालुक्याचे ठिकाण असलेल्या जाफराबाद शहराला जोडणाऱ्या विविध मार्गांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे. ही बाब पाहता बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.