पोलीस संरक्षणात सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:29 AM2018-05-11T01:29:04+5:302018-05-11T01:29:04+5:30
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव बंधाऱ्यात असलेले ६१ टक्के पाणी सोडण्यास शिवनगावकरांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शिवणगाव बंधा-यातील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव बंधाऱ्यात असलेले ६१ टक्के पाणी सोडण्यास शिवनगावकरांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शिवणगाव बंधा-यातील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले.
शिवनगाव बंधा-यातून पाणी सोडण्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासुन सुरू होता. बंधा-याच्या खालील भागात असणा-या गावांना पाणी सोडल्यास मोठा दिलासा मिळणार असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत होती. मात्र, ग्रामस्थांनी यास विरोध असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची संबंधित विभागाने दखल घेत बंधा-याचा एक दरवाजा गुरुवारी पूर्ण उघडून दोन दलघमी पाणी खाली सोडण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास बंधा-याचा दरवाजा बंद करण्यात आल्याचे पाठबधारे विभागाकडून सांगण्यात आले. पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक डी. एन. चामे, शाखा अभियंता पी. बी. देशपांडे व एस. बी. शेख यांची उपस्थिती होती घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, मधुकर बिक्कड, राठोड हे उपस्थित होते. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्याने बंधाºया खालील गुंज, भादली, शिरसवडी, कवडगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.