निम्न दुधनाच्या १६ दरवाजांतून परभणीसाठी पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:01 AM2019-06-03T01:01:13+5:302019-06-03T01:01:30+5:30
निम्न दुधना प्रक ल्पाचे सोळा दरवाजे शनिवारी रात्री उघडण्यात आले असून, परभणीकडे झपाट्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रक ल्पाचे सोळा दरवाजे शनिवारी रात्री उघडण्यात आले असून, परभणीकडे झपाट्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी ४० किलोमीटरपर्यंत गेले असून, सोमवारी सकाळपर्यंत परभणीत धडकणार आहे.
निम्न दुधना प्रकल्पातून शनिवारी परभणीकडे पाणी सोडण्यात आले. सुरवातील सहा दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, रात्री उशीरा पुन्हा दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. आता सोळा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाणी सोडण्यात आल्याने धरणातील मृत साठ्यात घट होण्याबरोबरच बॅक वॉटरही खाली जात आहे. पाणी सोडल्यामुळे काही पाणी पुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत. एकूणच फारसा गाजावाजा न करता पाणी सोडा- सोडीच्या गदारोळात परभणी जिल्ह्याचेच राजकिय वजन भारी पडल्याचे चित्र आहे. परतूर व मंठा तालुक्यातील सर्व पक्षीय आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी प्रशासनाने न जुमानता हे पाणी परभणीकडे सोडले आहे. दरम्यान, हे पाणी धरणापासून ४० किलोमीटरपर्यंत गेले आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे पाणी परभणीत धडकणार आहे.