जलवाहिनी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:03 AM2018-12-23T01:03:22+5:302018-12-23T01:04:20+5:30
घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव गावाला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी अज्ञात इसमाने फोडल्याने हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव गावाला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी अज्ञात इसमाने फोडल्याने हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी झाली. जलवाहिनी खोडसाळपणाने शनिवारी फोडल्याने मोठे भगदाड पडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
बाणेगाव येथील गट क्रमांक ११३ मधील सार्वजनिक विाहिरीवरुन गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. विहिरीवरुन गावापर्यत अडीच कि.मी. अंतर्गत जलवाहीनी टाकण्यात आली आहे. २००४ पासून सार्वजनिक विहिरीवरुन पाणीपुरवठा बंद होता. मात्र नवनियुक्त सरपंच मंगल उढाण यांच्या प्रयत्नातून गावाला ऐन दुष्काळात पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र कोणीतरी खोडसावपणे अंतर्गत जलवाहिनीला मोठे भगदाड पाडल्याने पाण्याची नासाडी झाली. याचा पोलिसांनी शोध घेऊन संबधीताविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.