‘त्या’ भागातील पाणीप्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:39 AM2018-04-18T00:39:08+5:302018-04-18T00:39:08+5:30
राजपूत गल्ली भागातील हातपंप दुुरुस्त करण्यात आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी मंगळवारी दिली. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : येथील राजपूत गल्ली भागातील हातपंप दुुरुस्त करण्यात आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी मंगळवारी दिली. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.
राजपूत गल्ल्लीतील महिलांनी पाणीपुरवठाच्या अडचणी सोडविल्या जात नसल्याने दोन दिवसांपूर्वी पाणीच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. नगरसेवक कृष्णा आरगडे, मुख्याधिकारी ईरलोड यांनी पाणी अडचण सोडविण्याची ग्वाही दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. नगरपालिकेने दुस-याच दिवशी या भागातील हातपंप दुरुस्त केले. कमी दाबाने पाणीपुरवठ्याची समस्या सोडली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वाढीव निधी देऊन सहकार्य केले आहे. शहरातील पाणी प्रश्न नगरपालिकेशी संबंधित असल्यामुळे पालिकेकडून आवश्यक उपाय योजना केल्या जात असल्याचे ईरलोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.