राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:44 AM2019-05-31T00:44:48+5:302019-05-31T00:45:02+5:30

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले

Water in Rajur | राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले असून राजूरसह परिसरात पाणीसमस्येने रोैद्र रूप धारण केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
यावर्षी दुष्काळाच्या दाहकतेने नागरिक हैराण आहेत. त्यातच पाणी समस्येने सर्वत्र नागरिक त्रस्त आहे. चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून राजूरसह परिसरातील पंधरा गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा केला होता. तसेच सध्या शासकीय टँकरने भोकरदन शहरासह सुमारे ४० गावातील ग्रामस्थांना बाणेगाव धरणाच्या आसपासच्या विहिरी अधिग्रहण करून शासकीय टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात होती. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून बाणेगाव धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे आसपासच्या विहिरींचा जलस्त्रोत कमी पडला आहे. विहिरीत मुबलक जलसाठा उपलब्ध होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंतीची वेळ आली आहे. विहीरींची सुध्दा पाणीपातळी खालावल्याने भोकरदन शहराला होणाऱ्या टँकरच्या फे-या कमी करण्यात आल्या असून बाणेगाव प्रकल्पात गेल्या दोन वर्षापूर्वी चर खोदून जलस्त्रोत तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, धरणात खडक असल्याने तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे यावर्षी चर खोदण्याचा प्रयत्न झाला नाही.
परिसरातील चाळीस गावांना होणा-या टँकरच्या फेºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथे खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून बाणेगाव चांधई एक्को धरणाच्या आसपासच्या विहिरीतून खाजगी टँकरचालक पाणी आणून विक्री करीत होते. परंतु, विहिरींची पाणी पातळी खालावल्याने टँकर चालकांना पाणी मिळत नाही.
पाणी समस्या गंभीर बनल्याने टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. विकत पाणी घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.
उन्हाळ््याच्या अंतिम टप्प्यात पाणी समस्येने रौद्र रूप धारण केल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची सोय करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन खाजगी टँकरच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी होत आहे.

Web Title: Water in Rajur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.