धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:47 AM2018-10-02T00:47:10+5:302018-10-02T00:48:31+5:30

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.

Water shortage due to dams | धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लेहा : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.
येथील धरणातून लेहा, जळगाव सपकाळ, शेलूद अन्वा, हिसोडा, वडोद तांगडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध खुर्द, पारध बु, अवघडराव सावंगी आदी दहा गावांना शेलुदच्या धरणावरुन पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या चाळीस वर्षापासून धरणातील गाळ काढण्यात आला नसल्याने धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठण्यास अडचणी आल्या. यंदा परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. सुरुवातीच्या पावसाने धरणात पडलेले खड्डे बुजून गेले. परतीचा पाऊस पडेल अशी आशा नागरिकांना लागली आहे. मात्र अद्यापही पावसाचा पत्ता नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असतांना उन्हाळ्यासारखे उन परिसरात पडत आहे.यामुळे धरणात साचलेलेल डबके सुध्दा आटून गेले आहे. आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. परिसरातील अनेक गावात तर नागरिकांनी टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पिण्याची पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. नदी नाले कोरडे असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी कपाशी, मिरची पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
यामुळे प्रशासना आतपासूनच परिसरातील पाणी टंचाईवर उपायोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच टँकरणे पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे.

Web Title: Water shortage due to dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.