जीवरेखा धरणातील पाणी चोरी; विद्युत पुरवठा केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:05 AM2018-11-07T00:05:18+5:302018-11-07T00:05:18+5:30

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले असतानाही धरण परिसरातील काही शेतकरी पाण्याची चोरी करीत असल्याचे तक्रारी येताच मंगळवारी पोलीस, महसूल व पाटबंधारे विभागाने विद्युत पुरवठा खंडित करुन एक इलेक्ट्रिक मोटार पंप, दहा बंडल केबल साहित्य जप्त केल्याने पाणी चोरी करणाऱ्यात धास्ती पसरली आहे.

Water stolen from Jivrekha dam; Turned on the supply of electricity | जीवरेखा धरणातील पाणी चोरी; विद्युत पुरवठा केला खंडित

जीवरेखा धरणातील पाणी चोरी; विद्युत पुरवठा केला खंडित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले असतानाही धरण परिसरातील काही शेतकरी पाण्याची चोरी करीत असल्याचे तक्रारी येताच मंगळवारी पोलीस, महसूल व पाटबंधारे विभागाने संयुक्त कारवाई करून धरण परिसरातील विद्युत रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करुन एक इलेक्ट्रिक मोटार पंप, दहा बंडल केबल साहित्य जप्त केल्याने पाणी चोरी करणाऱ्यात धास्ती पसरली आहे.
परिसरात आधीच अल्पसा पाऊस झाल्याने नदी नाले कोरडेठाक आहेत. परिसरातील जीवरेखा धरणात असलेला पाणीसाठूनया कारवाईने धरण परिसरातील शेतक-यात एकच खळबळ उडाली होती. पथकाची भनक लागताच पाणी चोरी थांबवून पळ काढल्याचे कळते.
ही कारवाई नायब तहसीलदार चंडोल, टेंभुणीर्चे सपोनि शंकर शिंदे, पाटबंधारेच्या शाखा अभियंता माधुरी जुन्नारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक पंकज मोरे, बीट जमादार अशोक जाधव, तलाठी गणेश तांगडे, आर. व्ही. धनेश, ए. एन. मोरे, चौधरी, म्हस्के, पाटबंधारे विभागाचे टी. आर. जगदाळे, व्ही. पी. चेके, यु. एस. गायकवाड, पी. टी. चव्हाण, यु. के. रजाळे आदीची उपस्थिती होती.

 

Web Title: Water stolen from Jivrekha dam; Turned on the supply of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.