२२ दिवसात वाढला २९ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:47+5:302021-09-24T04:35:47+5:30
जालना : चालू महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गत आठवड्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. सातत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ...
जालना : चालू महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गत आठवड्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. सातत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ४६ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. विशेषत: मागील २२ दिवसांमध्येच या प्रकल्पांमध्ये तब्बल २९ टक्के पाणीसाठा वाढला आहे.
यंदा प्रारंभीपासूनच पावसाने जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मिमी आहे. परंतु, आजवर जिल्ह्यात तब्बल ९७७.३० मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या १६२.५० टक्के पाऊस झाला आहे. विशेषत: चालू महिन्यात तब्बल दमदार पाऊस होत आहे. सातत्याने अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांसह फळबागांना अधिकचा फटका बसला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पडणाऱ्या पावसामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे जिल्ह्यातील प्रल्पांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४६ प्रकल्प तुडुंब झाले आहेत. तीन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा झाला आहे. चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ प्रकल्पांच्या क्षेत्रात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या आठही प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांच्या मध्येच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. इतर प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक समाधानकारक आहे. जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा करणारे बहुतांश प्रकल्प समाधानकारकरित्या भरले आहेत. त्यामुळे या भागांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.
चौकट
मध्यम प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प उपयुक्त पाणी
कल्याण गिरजा प्रकल्प जालना १०० टक्के
कल्याण मध्यम प्रकल्प जालना ९२.९६ टक्के
अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर ७५.४५ टक्के
जुई मध्यम प्रकल्प भोकरदन १०० टक्के
धामना मध्यम प्रकल्प भोकरदन १०० टक्के
जीवरेखा मध्यम प्रकल्प जाफराबाद ४३.२३ टक्के
गल्हाटी मध्यम प्रकल्प अंबड १०० टक्के