वॉटरग्रीडमधून १७६ गावांना शुद्ध पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:52 AM2018-04-05T00:52:58+5:302018-04-05T00:52:58+5:30
जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
मंठा तालुक्यातील बरबडा व कर्णावळ येथे अंतर्गत पाईपलाईन अंथरण्याच्या कामाचे उद्घाटन बुधवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे, संदीप गोरे, राजेश म्हस्के, कल्याण खरात, कैलास बोराडे, कैलास बोराडे, राजेश मोरे, पंजाबराव बोराडे, शिवदास हानवते आदींची उपस्थिती होती.
लोणीकर म्हणाले की, जालना, मंठा व परतूर तालुक्यातील १७६ गावांना ग्रीड योजनअंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कामासाठी ८ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
या वेळी विष्णू फुपाटे, प्रदीप बोराडे, नागेश घारे, दत्तराव कांगणे, भगवान राठोड, निवास देशमुख, नरसिंग राठोड, माऊली गोंडगे, मुस्तफा पठाण, बंडू बिडवे, गणेश चव्हाळ, कल्याण कदम, सोपान खरात, रामकिसन मुसळे, कैलास चव्हाण, भीमराव राठोड, त्र्यंबक हजारे, द्वारकादास चिंचाणे, गिताराम हजारे, प्रभाकर हजारे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बरबडा गावासाठी २१ लक्ष २८ हजार, कर्नावळसाठी १३ लाख ५१ हजार, उस्वद (देवठाणा) १३ लाख ३८ हजार तर वझर सरकटेसाठी ७ लाख ६६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाईपलाईनचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हे काम जूनपूर्वी करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठ्याअभावी तसेच देयकाअभावी या योजनेचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सोलार योजनेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मंठा, परतूर तालुक्यातून जाणाऱ्या शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.जिल्ह्यातील १५ हजार शेतक-यांना वीजजोडणी देण्याबरोबर १५ हजार ट्रॉन्सफार्मरची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.