केदारखेडा येथील पाणीपुरवठा सहा दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:20+5:302021-01-23T04:31:20+5:30

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातील पाणीपुवठा गत सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी याची दखल घेत ...

Water supply at Kedarkheda closed for six days | केदारखेडा येथील पाणीपुरवठा सहा दिवसांपासून बंद

केदारखेडा येथील पाणीपुरवठा सहा दिवसांपासून बंद

Next

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातील पाणीपुवठा गत सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांनी याची दखल घेत तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील दोन दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

केदारखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीपात्रातील सार्वजनिक विहिरीचे पाणी संपुष्टात आल्याने सहा दिवसांपासून गावातील नळांना येणारे पाणी बंद झाले आहे. त्यातच गाव कारभारी नवनियुक्त असून, हाती कारभार घेतला नसल्याने कोणाकडे ग्राहणे मांडावे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता; परंतु नवनिर्वाचित सदस्यांना पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर संदीप शेळके व नवनिर्वाचित सदस्यांनी पाणीपुरवठा कशामुळे बंद आहे? याची माहिती ग्रामसेविका के. एल. रोकडे व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. नदीपात्रातील विहिरीचे पाणी संपले असल्याचे कळाल्यानंतर तात्काळ बानेगाव धरणातील जिल्हा परिषदच्या निधीतून झालेल्या पाइपलाइनची पाहणी करण्यात आली. या पाइपलाइनला असलेली अडचण तात्काळ निकाली काढून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. शिवाय दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी संदीप शेळके, ग्रामपंचायत सदस्य पंडित जाधव, ज्ञानेश्वर जाधव, रतन जाधव, बालू जाधव, बालासाहेब करतारे, ग्रामपंचायतचे लिपिक बालू जाधव, पाणीपुरवठा कर्मचारी किसन हगाम, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती.

Web Title: Water supply at Kedarkheda closed for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.