शेंद्रा-जालना योजनेतून पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:57 AM2018-03-16T00:57:17+5:302018-03-16T00:57:19+5:30
आगामी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेंद्रा-जालना पाईपलाईनमधुन शहरासाठी पाणी घेण्याच्या ठरावासह विविध विषयांना नगरपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : शहराला आगामी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेंद्रा-जालना पाईपलाईनमधुन शहरासाठी पाणी घेण्याच्या ठरावासह विविध विषयांना नगरपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली
बदनापूर नगरपंचायतची सर्वसाधारण सभा अध्यक्षा चित्रलेखा ज-हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात सोमठाणा विहिरींसाठी २० एच.पी. ची मोटार खरेदी करणे, शहरात नवीन पाईप लाईन टाकणे, विंधन विहीर घेणे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपींग ग्राऊंडसाठी जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, मानधन तत्वावर आवश्यकतेनुसार कर्मचा-यांची तात्पुरत्या स्वरूपात विविध दरपत्रकाच्या दरपत्रकास मान्यता देणे, कार्यालयाचे फर्निचर व इमारत दुरूस्ती करणे, शहरात आवश्यकतेनुसार कचरा कुंड्या व डस्टबीन बसविणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत विकास कामांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविणे, विविध वार्डांमधे नवीन विद्युत पोल घेवुन त्यावर स्ट्रीट लाईट सौरउर्जा लाईट बसविणे इ. विषयांना मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले़