शहागड येथे गोदावरीच्या पात्रात वाळूमाफियांचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:19 AM2017-12-21T00:19:59+5:302017-12-21T00:20:17+5:30
अवैधपणे गोदावरीचे पात्र पोखरणाºया वाळूमाफियांनी पात्रात धिंगाणाच घातला. महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा राग आल्याने वाळूमाफियांनी महसूलच्या पथकावर दगडफेक केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. तत्पूर्वी गेवराई तालुक्यातील सात ट्रॅक्टर गोंदी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. या प्रकरणी शहागड पोलिसात बीड जिल्ह्यातील पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड (जि.जालना) : अवैधपणे गोदावरीचे पात्र पोखरणाºया वाळूमाफियांनी पात्रात धिंगाणाच घातला. महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा राग आल्याने वाळूमाफियांनी महसूलच्या पथकावर दगडफेक केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. तत्पूर्वी गेवराई तालुक्यातील सात ट्रॅक्टर गोंदी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. या प्रकरणी शहागड पोलिसात बीड जिल्ह्यातील पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील महसूलचे पथक गेवराईच्या हद्दीतील अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करत असल्याचा राग आल्याने बुधवारी सकाळी अंबड महसूलच्या पथकाच्या गाडीवर गेवराई तालुक्यातील २० वाळू तस्करांनी दगडफेक केली. बुधवारी सकाळी गाडी गोदापात्रात गेल्यानंतर ही घटना घडली. यावेळी हल्लेखोरांनी पथकप्रमुख मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांना शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्नही केला. या प्रकरणी मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या फिर्यादीवरून कृष्णा बेद्रे, दादा माळी, भरत देवकते, गणेश जराड, नारायण भुसारे यांच्यासह पंधरा संशयितांवर शहागड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
च्गोदावरी नदी पात्र बीड जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे गोदावरीचा काही भाग गेवराईत तर काही भाग अंबड तालुक्यात येतो. काही दिवसांपासून अंबड महसूलच्या पथकाने वाळूतस्करांवर कारवाई सुरु केली आहे.
च्या कारवाईत गेवराई तालुक्यातील खामगाव, नागझरी, व आगरनांदरची काही वाहने जप्त करण्यात आली आहेत.